राजुरीत दोन घरांत चोरी; ५ लाख रुपयांचे दागिने; ५० हजारांची रोकड लंपास; आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल

1 min read

राजुरी दि.२९:- जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे चोरटयांनी दोन घरे फोडुन‌ एका घरातील वृध्द दाम्पत्यास काठीने ने मारहाण करून सुमारे १० तोळे

दागिने व बंद घरातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम अशी एकूण ४ लाख ९८ हजार रुपयांची चोरी झाली असल्याची फिर्याद भरत रामदास पिंगळे (वय ३९, रा.राजुरी) यांनी आळेफाटा पोलिसांत दिली आहे.

याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील लवणमळ्यात रहात असलेले रामदास रघुनाथ पिंगळे व त्यांच्या पत्नी सिंधूबाई पिंगळे तसेच मुलगा भरत पिंगळे हे

शुक्रवार दि.२८ रात्री नेहमीप्रमाणे झोपले असता मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ३ ते ४ चोरटयांनी घराचा दरवाजा तोडुन आतमध्ये प्रवेश करत घरात असलेल्या कपाटाचा दरवाजा उघडत असताना

आवाज आल्याने झोपलेले रामदास पिंगळे यांना जाग आली असता आरडाओरड करण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी लगेच रामदास यांना मारहाण केली तर महिलेचे तोंड दाबत गळ्यात व कानात असलेले दागिने काढुन दे सांगितले.

परंतु सदर महिलेने दागिणे देण्यास नकार दिला असता चोरट्यांनी त्यांना काठीने मारहान करत अंगातील व कपाटात असलेले दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच याच घराशेजारी त्यांच्या दुस-या मुलगा कामा निमित्ताने बाहेर गावी असल्याने बंगला बंद होता.

याचा फायदा चोरट्यांनी घेत बंगल्याचा दरवाजा तोडुन आतमध्ये असलेला कपाटातील ५० हजार रुपये चोरून नेले आहे. घटनास्थळी आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे

यांच्या मार्गदर्शनाखाली नविन अरगडे यांनी भेट देत पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दुर्वे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे