आळे येथे वनविभागाची मोठी कारवाई
1 min read
आळेफाटा दि.३०:- आळे तालुका जुन्नर येथील कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर एक अवैधरित्या लाकडाने भरून भरलेल्या ट्रक वन विभागाने पकडला असून चालकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत वन विभागाने दिलेली सविस्तर माहिती अशी की, २९ रोजी रात्री ९.३० वा च्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे एक अवैद्य लाकडाने भरलेला ट्रक कल्याण- अहिल्यानगर रोड ने जात असल्याचे समजताच त्याला आळे येथे पकडण्यात आला.
गाडी नंबर – MH05 AM 0714 त्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 व कलम 42 अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही सर्व कारवाही उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस व वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ तसेच इतर वन कर्मचारी कैलास भालेराव, विशाल गुंड, महेश जगधने, साहेबराव पारधी, फुलचंद खंडागळे यांनी केली.
सदर ट्रकमध्ये त्यामध्ये अंदाजे 8.50 घन मीटर जळाऊ लाकूड असून त्याची बाजारभावाप्रमाणे साधारण किंमत 40 ते 45 हजार रुपये आहे तसेच जप्त केलेल्या ट्रक ची किंमत 6 लाख रुपये आहे. विना परवाना वाहतूक करणाऱ्या आरोपीचे नाव चंद्रकांत गणपत शेटे (पत्ता:राहणार उल्हासनगर, ता.कल्याण,जि.ठाणे)
असे असून त्याच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 व कलम 42 अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांना वनविभागाकडून आव्हान करण्यात येते
की अवैध वृक्षतोड व विना परवाना लाकूड वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे अन्यथा संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल.