दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना आळेफाटा पोलिसांनी केले जेरबंद
1 min read
आळेफाटा दि.३१:- दुचाकी चोरी करणारी परजिल्हयातील टोळीला आळेफाटा पोलीसांनी जेरबंद करत ३ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार भटकळवाडी (ता.जुन्नर) येथिल गणेश भारत लेंडे यांनी त्यांची घरासमोर मोकळया जागेत हॅन्डल लॉक करून. लावलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल क्रमांक एम. एच १४ एस.एल २२२३ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेबाबत ची फिर्याद सन २०२४ मध्ये नोंदवली होती.सदर दाखल गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी विशेष पथके बनवुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन करून व गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळवुन त्यानुसार यातील अज्ञात आरोपींचा माग काढत १) रोहन अनिल अभंग वय २८ वर्षे रा. देवाचामळा, संगमनेर ता.संगमनेर जि. अहिल्यानगर यांस अत्यंत शिताफीने संगमनेर येथून ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले.
की सदरचा गुन्हा हा २) हनुमंत सिताराम गर्जे वयं २९ वर्षे रा.आंबलवाडी ता. आंबेजोगाई जि.बिड यांच्या मदतीने केला असून सदरची बुलेट मोटर सायकल कमांक एम.एच १४ एस.एल २२२३ हि त्यांच्याकडे असल्याची कबुली दिली असल्याने तात्काळ आळेफाटा पोलीस स्टेशनकडील पथकांना आंबेजोगाई,
बीड येथे रवाना करून आरोपी हनुमंत गर्जे यांस ताब्यात घेवून त्याच्या कडे अधिकची चौकशी केली असता त्यांने आळेफाटा ता. जुन्नर जि.पुणे येथून टि.व्ही. एस. कंपनीची रायडर डिस्क मॉडेलची काळया रंगाची मोटार सायकल एम.एच.२२ बी.ई ०९१६ ही पण चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.
आरोपींकडुन ३ लाख ५१ हजार रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर, स्था.गु.शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पो.हवा विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पंडीत थोरात, पो.कॉ नविन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.