दिवसा घरफोडी करणारे दोघे जेरबंद
1 min read
अहिल्यानगर दि.१:- अहिल्यानगर शहरातील नक्षत्र लॉन परिसरात दिवसा घरफोडी करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.रवी रामकुमार सोलंकी (वय २५, रा.खुर्जा बुलंद शहर, ता.खुर्जा, उत्तरप्रदेश), दुष्यंत कुमार धिरेसकुमार यादव (वय २३, रा.बरसामई, ता. सिकंदराराव, जि. हाथरस, उत्तरप्रदेश) दोन्ही हल्ली रा.प्लॅट क्र.१, साई अपार्टमेंट, घुलेनगर, वडगाव बुद्रुक, ता.हवेली, जि.पुणे), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा रवी सोलंकी याने केला असून तो पुणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.