दुचाकी चोराला नेवासा पोलिसांनी ४८ तासांत केले जेरबंद

1 min read

नेवासा दि.१:- नेवासा पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने चोरीचा गुन्हा अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणून आरोपीला अटक केली.

या चपळ कारवाईमुळे संतोष खाडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे.

पावन गणपतीजवळ राहणाऱ्या शिक्षक सुरज राज पठारे (वय २८) यांच्या घरासमोरून ५० हजारांची पल्सर मोटारसायकल आणि श्रीपार्वती ऑईल अॅण्ड प्रोडक्ट दुकानातून चोरट्याने दरवाजाचा कोंडा वाकवून १० हजारांचे तेल, २ हजारांचा गूळ, १५०० रुपयांचे तूप आणि ३ हजार रोख, असा ६६,५०० रुपयांचा माल चोरला. याप्रकरणी नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. संतोष खाडे यांनी तपासाला गती देत पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, अजय साठे, सुमित करंजकर, नारायण डमाळे, अप्पासाहेब तांबे, श्रीनाथ गवळी आणि अरविंद वैद्य यांचे पथक तयार केले. गोपनीय माहितीवरून कृष्णा नारायण भोसले (रा. बेलपिंपळगाव) हा आरोपी असल्याचे समजले. तो गाढवनाला येथील पारधी वस्तीत लपल्याची खबर मिळताच पथकाने सापळा रचला.मिळताच पथकाने सापळा रचला. पळणाऱ्या आरोपीला नारायण डमाळे यांनी पाठलाग करून पकडले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. अटकेनंतर पुढील तपास अजय साठे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे