उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

1 min read

अहिल्यानगर दि.२८:- शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगचित्रे रेखाटण्यात आली आहेत. या ठिकाणी महापालिकेकडून जाहिराती, फलक लावण्यास परवानगी दिली जात नाही, हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

तरीही, या पिलरवर विनापरवाना जाहिरातबाजी करून त्याचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. या प्रकरणी जाहिरातबाजी करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. मार्केटयार्ड चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरवर जाहिरात पोस्टर लावल्याची माहिती आयुक्त डांगे यांना मिळाली होती. त्यांनी प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांना आदेश देत तत्काळ तपासणी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विशाल गवारे (रा. खराडी बायपास बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, तिसरा मजला, पुणे) याच्या विरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे