देशमुखांची हत्या आम्हीच केली; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

1 min read

बीड दि.२८:- केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असून वाल्मिकच्या तीन चेल्यांकडून खून केल्याची कबुली देण्यात आली आहे. आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने आता वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.सुदर्शन घुले हा सुरुवातीला या हत्याप्रकरणात आपला सहभाग असल्याचे नाकारत होता. मात्र, पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्याने पटापट या संदर्भातील माहिती दिली.आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुखांनी आम्हाला मारहाण केली. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच त्यांनी आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून आम्हाला आव्हान दिले. याचा राग आमच्या मनात होता. तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही २९ डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली, अशी कबुली सुदर्शन घुलेकडून देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे