सांगली, सातारा, कोल्हापूर,मिरज, सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, रस्त्याला नदीचे स्वरूप
1 min read
सातारा दि.२५:- ढगांच्या गडगडाटासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांत आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच सांगली, सातारा, सिंधुदुर्गातदेखील जोरदार अवकाळी पाऊस बरसला. काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या.
सांगलीतील मिरजमध्ये विजांच्या लखलखाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मिरजेला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभराच्या उकाड्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज खंडित करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. ऐन उन्हाळ्यात दोडामार्ग तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.
तिलारी, साटेली-भेडशी गावात जोरदार पाऊस बरसत आहे. गेल्या तासाभरापासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. जोरदार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे काही भागात विज पुरवठा खंडीत झाला आहे.
सावंतवाडी, कुडाळ तालुक्यातही जोरदार पाऊस बरसत आहे. अवकाळी पावसामुळे आंबा काजूच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. सातारा शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरवात केली आहे. काशीळ परिसरातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
उन्हाने हैराण झालेल्या सांगली आणि मिरजकरांना पावसामुळे गारवा मिळाला आहे. सायंकाळी ५ च्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्याचा तडाका सांगली आणि मिरज पूर्व भागाला बसला आहे. पावसामुळे अनेक झाडाच्या फांद्या रस्त्यावर उन्मळून पडल्या आहेत.