औटी मळा अंगणवाडी केंद्रातील मुलांचे JE चे लसीकरण
1 min read
नारायणगाव दि.२५:- औटी मळा , ओझर रोड येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जुन्नर , अंगणवाडी केंद्र – ओझर रोड, येथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन वारूळवाडी आरोग्य केंद्र नारायणगाव यांच्या वतीने वयोगट ०१ ते ०५ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना जापनीज इन्सेफेलाईटिस (JE ) ची म्हणजेच मेंदूज्वराची लस देण्यात आली. जवळपास 55 मुलांना ही मेंदू ज्वराची लस देण्यात आली. या लसीकरण कार्यक्रमासाठी स्थानिक माता भगिनींनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. यासाठी सिस्टर मंगल वाडेकर, आशा वर्कर मनीषा विटे, शैला बांबळे यांच्या वतीने लहान मुलांना लस देण्यात आली.
यासाठी अंगणवाडी सेविका सुरेखा औटी, मदतनीस सुनिता पांचाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे ज्या मुलांना ही लस मिळाली नाही त्यांनी वारुळवाडी येथील सरकारी दवाखान्यात जाऊन ही लस घेण्याचे आव्हान वाडेकर सिस्टर व आशा वर्कर यांच्या वतीने करण्यात आले.