लाच मागणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा दाखल
1 min read
अहिल्यानगर दि.२१:- तालुक्यातील वाकोडी येथील बक्षीस पत्राद्वारे दिलेल्या जमिनीची नोंद लावण्यासाठी तलाठ्याने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच ही लाच स्वीकारण्याची तयारीही दर्शवली. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी राहुल अरुण होटकर याच्या विरोधात मंगळवारी (ता. १८) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. वाकोडीत एका व्यक्तीची जमीन आहे. ही जमीन बक्षीस पत्राद्वारे त्याच्या भावाला दिली आहे.
त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर लावण्यासाठी होटकरने दोन हजार रुपयांची लाच ३ फेब्रुवारीला मागितली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तलाठी होटकरने लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला.