अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल:- विखे पाटील

1 min read

अहिल्यानगर दि.१३:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अशा राज्यातील नदीजोड प्रकल्पाला निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील तरतुदीने मोठे पाठबळ मिळेल. गोदावरी पुनर्भरण आणि मराठवाडा ग्रीडसाठी केलेल्या अर्थिक तरतुदीमुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे महायुती सरकारचे स्वप्न पूर्ण होईल. असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त करून अर्थसंकल्पाचे स्वागत केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांकरीता पाठबळ देणारा असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सिंचन प्रकल्पाकरीता सिंचन सुधारणा कार्यक्रमासाठी नाबार्डच्या सहकार्याने ५०० कोटी रुपयांची केलेली तरतूद महत्वपूर्ण आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार याचाही मोठा लाभ शेतकऱ्यांना होईल, असे विखे पाटील म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे