६२ लाखांचा बनावट बासमती तांदूळ जप्त
1 min read
अहिल्यानगर दि.२८:- अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात बासमती तांदळाच्या नावाखाली बनावट तांदूळ तयार करून विक्री केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून ६२ लाख रुपयांचा तांदूळ जप्त केला आहे. या तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.एमआयडीसी परिसरात बनावट बासमती तांदूळ तयार केला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने मे.खुशी इंडस्ट्री या आस्थापनांच्या गोदामावर छापा टाकला. त्याठिकाणाहून साठविलेला तांदूळ व वापरण्यात येणारी रासायनिक पावडर ताब्यात घेतली आहे. तांदळाचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.