पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर यांना राज्यस्तरीय पूरस्कार प्रदान
1 min read
अहिल्यानगर दि.९:- स्वराज सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2025 चा राज्यस्तरीय सन्मान पेमदरा गावच्या सरपंच जयश्री पाटीलबा गाडेकर यांना मिळाला. या वेळी उपसरपंच बाळासाहेब दाते, ग्रामविकास अधिकारी मिनाक्षी शेंडकर तसेच सोबत मुक्ताजी दाते भाजप विस्तारक जुन्नर, पाटील गाडेकर, जालिंदर बेलकर पोलिस पाटील पेमदरा व सर्व ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.सरपंच जयश्री गाडेकर सरपंच पदावर आल्यापासून ग्रामपंचायत मध्ये मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून.
सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे ग्रामसेवक नेते एकनाथ ढाकणे यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते व यादव पावसे पाटील, रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे संपन्न झाला.