पारनेर तालुक्यातील दरोड्यातील चार आरोपी जेरबंद

1 min read

अहील्यानगर दि.२२:- नेवासा, पारनेर तालुक्यात घरफोडी करणारे चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपींना पुढील तपासासाठी सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अनिल नंदु पवार (वय ३४, रा.शिरसगाव, ता.नेवासा), बाळू मोहन पवार (वय ३२, रा.वाळुंज), संदीप बबन बर्डे (वय ३७, रा.देहरे),जिवन बाबासाहेब खंडागळे (वय २२, रा.माळीसागज, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस अंमलदार फुरकान शेख, सागर ससाणे, अमृत आढाव, सुनिल मालणकर, भगवान थोरात, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मेघराज कोल्हे व अरूण मोरे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी ताब्यात घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे