राज्यात लवकरच 10,500 रिक्त पदांसाठी पोलीस भरती

1 min read

मुंबई दि.२०:- महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये गुन्हेगारीत झालेली वाढ आणि पोलीस दलातील कर्मचारी संख्येची कमतरता यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा तापला असताना, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये पोलीस भरती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर विशेष भर देण्यात येणार आहे.राज्यात लवकरच 10,500 रिक्त पदांसाठी पोलीस भरती राज्यातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण येत असल्याचे फडणवीस यांनी मान्य केले. त्यांनी सांगितले की, सध्या राज्यात 10,500 पोलीस पदे रिक्त आहेत. तर दरवर्षी 7 ते 8 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. या पार्श्वभूमीवर, मागील तीन वर्षांत राज्यात विक्रमी 35,802 पदांची भरती करण्यात आली आहे. आता उर्वरित रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. विशेषतः पोलीस उपनिरीक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्याचे काम पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे