खोक्या, बोक्या, कुणीही असो सोडणार नाही, ठोकणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

शिरूर दि.१५:- बीड जिल्ह्यातील शिरूर कासार पासून काय अंतरावर असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले यांच्या घरावर आज वन विभाग आणि पोलिसांनी धडक कारवाई केली. वनविभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी खोक्याचा घर बुलडोझरने उद्ध्वस्त केला आहे.त्या आधी या घरातून वन्य प्राण्यांचे मांस तसेच इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले होते. नोटांचे बंडल उडवतांना देखील व्हिडिओ याच घरातून काढले असल्याचं समोर आले होते. यानंतर आज वनविभागाने कारवाई करत त्याच्या घरावर बुलडोजर चालवला आहे. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.काही दिवसांपूर्वी एका तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. याप्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र काही दिवस खोक्या भोसले हा पोलिसांना गुंगरा देत तिकडून इकडून तिकडे फिरत होता. मात्र त्याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. यानंतर त्याला आता बीडच्या कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. त्या आधीच खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर वनविभागाने धडक कारवाई केली. यावर देवेंद्र फडवणीस म्हणाले की, खोक्या बोक्या किंवा ठोक्या कोणीही असो, आम्ही त्यावर ठोक कारवाई करू, असा इशारा देवेंद्र फडवणीस यांनी दिलाय.ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी बाहेर झाला होता. यात ढाकणे परिवाराने खोक्या भोसले याच्याविरोधात तक्रार दाखल करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर त्याला आता कोर्टात हजर केले जाणार आहे.

त्या आधी भोसलेच्या घरावर कारवाई करत काही साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. याच संदर्भात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे