विद्यानिकेतनच्या मुलांनी अनुभवला सूर्यमाला पाहण्याचा अनुभव
1 min read
खोडद दि.२८:- राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यानिकेतन पी.एम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी GMRT खोडद या विज्ञान केंद्राला भेट देऊन विविध वैज्ञानिक प्रयोगाचे अनुभव विद्यार्थ्यांनी स्वतः घेतले.खोडद येथील विज्ञान केंद्रात विविध भागातून विद्यार्थी भेट देण्यासाठी आले होते. यामध्ये विद्यानिकेतन संकुलातील विद्यार्थ्यांनी देखील सहभागी होऊन सूर्यमालेची सविस्तर माहिती घेतली व त्यांच्या मनात सूर्यमालेबद्दल असणाऱ्या विविध शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीचा विकास व्हावा म्हणून विद्यानिकेतन पी.एम हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे अध्यक्ष पांडुरंग साळवे,
प्राचार्य रमेश शेवाळे, त्यांच्याबरोबर कैलास घुले, रवींद्र पवार, छाया घाडगे, प्रियांका शेवाळे, अश्विनी गवारी, वर्षा टाव्हरे, ऋतुजा खर्डे, श्रीविद्या रणदिवे व तेजल डोके हे शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.