सात हजारांची लाच घेताना पोलीस ताब्यात
1 min read
श्रीगोंदा दि.२८:- श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारासह १३ नातेवाईकांकडून सात हजारांची लाच घेतांना पोलीस कर्मचाऱ्याला
लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. संतोष सुधाकर फलके (वय ४०, पद – पोलीस हवालदार, हल्ली रा. जकाते वस्ती, श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्या लाचखोर पोलिसाचे नाव आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार व त्यांचे इतर १३ नातेवाईक यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारांकडे २० हजार रुपयांची मागणी संतोष फलके यांनी केली.
याबाबत गुरुवार (ता. २७) रोजी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी पोलीस हवालदार संतोष फलके
याने तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे सात रुपयांची लाच पंचा समक्ष स्वीकारली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.