स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
1 min read
पुणे दि.१:- स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडेला पुणे न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरुरमधून त्याला अटक करण्यात आली होती आणि पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणात आरोपीसोबत आणखी साथिदार आहेत का? याचा तपास करायचा आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा असून त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.पुणे अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला अटक झाल्यानंतर त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. त्याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली.
यानंतर संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले गेले. यानंतर कोर्टाने दोन्हीही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. आरोपीने ताई म्हणून फिर्यादीला फसवलं. तुमच्या गावाला जाणारी बस कुठे लागते ते दाखवतो असं सांगून बसमध्ये घेऊन गेला. आरोपी सराईत आहे. त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहे.
त्यातील 5 महिला फिर्यादी आहेत. यावरून आरोपीचा महिलाकडे बघणायचा दृष्टीकोन समजतो, असा दावा पोलिसांनी कोर्टात केला.आरोपीने आणखी असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास करायचा आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता याचा तपास करायचा आहे. गुन्हा केला तेव्हा आरोपीकडे मोबाईल दिसून येतोय.
त्याचा तपास करायचा आहे. आरोपीचे कपडे जप्त करायचे आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास करायचा आहे. आरोपी कोणाच्या संपर्कात होता का? किंवा कोण कोण त्याच्याबरोबर होतं? फरारी काळात आरोपीला कोणी मदत केलीय का? याचा तपास करायचा आहे.
यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली. पोलिसांनी केलेल्या या मागणीला कोर्टाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यानंतर कोर्टाने आरोपी दत्तात्रय गाडेला 12 दिवसांची म्हणजे 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याआधी आरोपीच्या वकिलाकडून कोर्टात अनेक दावे करण्यात आले.