मोबाईल शॉपी फोडणाऱ्या संगमनेर च्या तिघांना अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलीसांची दबंग कामगिरी
1 min read
आळेफाटा दि.१:- जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे मोबाईल शॉपी फोडणा-या अहिल्या नगर जिल्ह्यातील चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी जेरबंद करून २ लाख १ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस स्टेशन दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री च्या सुमारास आळेफाटा (ता. जुन्नर) येथील एस.टी.स्टॅण्डचे पाठीमागील बाजुस असलेल्या गॅलेक्सी मोबाईल शॉपीचे छताचे पत्रा कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशानेतरी उचकटुन आतमध्ये प्रवेश करून दुकानामधुन ओपो, वन प्लस, एम. आय. रेडमी, रिअल मी, नोकिया, नारझो, पोको कंपनीचे असे एकुण २७ मोबाईल व रोख रक्कम मोबाईल सिम, बिल बुक,
एन्ट्री बुक असा मुद्देमाल चोरून नेलेबाबत चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचे गांर्भिय लक्षात घेता पोलिस निरीक्षक तायडे यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तपास चालु केला असता.
गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली असता सदर आरोपींनी चोरी करण्यासाठी पल्सर मोटार सायकल क्रमांक एम.एच.०५ डी.यू ६८३८ या गाडीचा वापर केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सदरचे आरोपी हे कळमजाई मुक्ताबाई यात्रेनिमित्त तमाशा पाहण्यासाठी येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने तमाशा ठिकाणी जावून शोध घेऊन
१) राहुल गोरख वारे वय २२ वर्षे रा. डिग्रस पो. मालुंजे ता. संगमनेर जि. अहिल्यानगर, २) किरण गेणभाऊ मेंगाळ वय २२ वर्षे रा. वडदरा पो. बोटा ता. संगमनेर जि. अहिल्यानगर,
३) सोमनाथ लहानु आगविले वय २१ वर्षे रा. साकुर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांच्याकडे चोरीस गेलेल्या मोबाईल बाबत चौकशी केली असता. त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून आम्ही सदरचे मोबाईल हे किरण गेणभाऊ मेंगाळ याच्या घरी लपवून ठेवले असल्याचे सांगितले, त्यानंतर सदरचे मोबाईल हे जप्त करण्यात आले असून त्यांना चोरी केल्याच्या गुन्ह्यावरून अटक करण्यात आली आहे.तसेच त्यांच्याकडुन चोरून नेलेले २५ मोबाईल व पल्सर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर, पुणे ग्रामीण चे स्था.गु.शा.पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे
यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पो. हवा सुनिल गिरी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, पो.कॉ नविन अरगडे, शैलेश वाघमारे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.