चाकूचा धाक दाखवून लुटणारे आरोपी सापळा रचून केले जेरबंद
1 min read
पाथर्डी दि.२५:- पाथर्डी व नेवासा येथे महिलांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ३ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सचिन ईश्वर भोसले (वय २५, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर), एका अल्पवयीन मुलगा (वय १७, रा.बेलगाव, ता.कर्जत), असे ताब्यात घेतलेल्या संशियत आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार सचिन भोसले याने चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून बेलगाव परिसरातून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पाथर्डी तालुक्यात सांगवी, करोडी व मालेवाडी परिसरात पैरेदार उमरका भोसले, गाडेकर झारक्या चव्हाण, (दोन्ही रा.नवी नागझरी, ता.गेवराई, जि.बीड), (दोघे पसार) यांनी केला असल्याचे तपासात समोर आले आहे.