विद्यानिकेतन संकुलात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

1 min read

बेल्हे दि.१८:- विद्यानिकेतन साकोरी मध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शिवव्याख्याती, श्रूतिका दाते हिच्या शिवव्याख्यानाने झाली, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच संभाजी राजे भोसले यांची वेशभूषा प्रधान करून कार्यक्रमाची विशेष शोभा वाढवली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांविषयी विविध भाषणे सादर करुन शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यानिकेतन पी. एम संकुलाचे अध्यक्ष पांडुरंग साळवे हे होते तसेच विद्यानिकेतन पी.एम हायस्कूल आणि कॉलेजचे प्राचार्य रमेश शेवाळे विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रूपाली भालेराव व उपप्राचार्य शरद गोरडे हे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका शेवाळे यांनी केले तर अनुमोदन संगीता औटी व प्रास्ताविक प्रतिभा गाडगे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यानिकेतन पी.एम हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज तसेच विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे