शिवनेरी केसरी स्पर्धेत सुरेश काकडे यांनी जिंकली ३० हजार रुपयांची कुस्ती
1 min read
जुन्नर दि.१९:- शिवनेरी महोत्सव 2025 शिवनेरी केसरी स्पर्धा कुस्तीगीर संघ जुन्नर तालुका आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये एकूण 500 अधिक मल्लानी सहभाग नोंदवला होता. यामध्ये जुन्नर तालुक्याचे नामवंत पैलवान कुस्ती कोचकअशी त्यांची ओळख असणारे सुरेश काकडे यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजय प्राप्त केलं. त्यांना एक ढाल आणि 30 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर व महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख हे दोन्ही मल्ल शेवटच्या कुस्तीसाठी उपस्थित होते. यामध्ये हर्षद सदगीर यांनी शेवटच्या कुस्ती विजय मिळवून एक चांदीची गदा व एक लाख एकवीस हजार पारितोषिक देण्यात आले. या कुस्तीमध्ये कुस्ती या स्पर्धेमध्ये 1000 ते एक लाख 21 हजार पर्यंतचे पारितोषिक होते.