श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालयात शिवरायांना मानवंदना

1 min read

निमगाव सावा दि.१९:- श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इब्राहिम सुलेमान पटेल माजी सरपंच निमगाव सावा हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना इब्राहिमशेठ पटेल म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा जन्म आपल्या जुन्नर तालुक्यात झाला हे आपले भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली व रयतेचे राज्य स्थापन केले. आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन या देशाची प्रगती करूया. नंतर कुमार संस्कार नवनाथ गाडगे या विद्यार्थ्यांने शिवगर्जना आपल्या बुलंद आवाजात सादर केली.तसेच याप्रसंगी वाचनालयाचे संचालक संजय उनवणे यांनी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. सखाहरी महाराज खाडे संचालक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बबन जिजाबा गाडगे यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपाध्यक्ष नवनाथ गाडगे यांनी भूषवले.

याप्रसंगी सर्व शिवप्रेमींसाठी पोहे व चहा वाचनालयाच्या वतीने ठेवण्यात आला होता. त्याचाही सर्व शिवप्रेमींनी लाभ घेतला.याप्रसंगी उपस्थितांमध्ये इब्राहिम पटेल माजी सरपंच, नुराभाई पटेल उपाध्यक्ष पांडुरंग दूध संस्था, रफिक पटेल माजी उपाध्यक्ष पांडुरंग दूध संस्था, जाकीर पटेल माजी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, सोपान मुंडे प्रसिद्ध गाडा मालक, आबु पटेल, हुसेन पटेल, राज मोहम्मद पटेल, शहाबुद्दीन पटेल, हारुण पटेल,बबन घोडे पाटील, सुनील शेळके, दगडू महाराज बोराडे, प्रतीक जावळे, रुपेश जावळे, कैलास भालेराव, युसुफ शेख, कांताराम गाडगे, शिवा खाडे, मयूर गाडगे,थिटे बाबा,नवनाथ गाडगे उपाध्यक्ष वाचनालय, बबन गाडगे संचालक, सखाहरी खाडे संचालक, संजय उनवणे संचालक, पीर महंम्मद पटेल संचालक, कुमार संस्कार गाडगे, इसाक पटेल, प्रदीप भालेराव, अब्दुल पटेल, साहिल घोडे, फोटोग्राफर प्रतीक शेलार, ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे व गावातील असंख्य शिवप्रेमी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक बबन जिजाबा गाडगे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे