स्वराज्य सोशल फाउंडेशन च्या वतीने शिवजयंती निमित्त शिवनेरी गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी चहा व नाष्ट्याची सेवा
1 min read
गुळूंचवाडी दि.१९:- शिवजयंतीच्या पवित्र पर्वावर शिवनेरी गडावर शिवज्योत सोहळ्यासाठी आलेल्या शिवभक्तांना स्वराज्य सोशल फाउंडेशन, गुळूंचवाडी तर्फे १८ फेब्रुवारी रात्री ८:०० वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी पहाटे ५:०० वाजेपर्यंत चहा आणि नाश्त्याची सेवा देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत सेवा करण्याचा मान मिळाला ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले.या उपक्रमासाठी राजेश भांबेरे , शिवाजी भांबेरे, संकेत काकडे, अक्षय कदम, बंटी पवार, अक्षय गुंजाळ, ओंकार गुंजाळ आणि प्रशांत कर्डीले यांनी विशेष पुढाकार घेतला.
सेवा आणि समर्पणाच्या मूल्यांचे पालन करत हा उपक्रम राबवण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर प्रेरित होऊन समाजासाठी कार्य करणे हेच खरे शिवरायांना वाहिलेलं आदरांजली स्वरूप सेवा कार्य आहे, असे स्वराज्य सोशल फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी सांगितले.