दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात प्रातःकाली शिवजयंती साजरी

निमगाव सावा दि.१९: – श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सूर्योदयापूर्वी शिवजयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला प्रा.अनिल पडवळ आणि उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन केले. प्रा.नीलम गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली कार्याचा उल्लेख केला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जोपासण्याची आणि आपल्या आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचार आपण अनुसरून पुढील पिढीला त्याचे शिक्षण देऊन.
महाराजांच्या विचारांचे मावळे म्हणजेच आजचे तरुण घडवून, देशाचे भवितव्य उज्वल करू शकतो असे सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रतापगडावर जाऊन आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून, त्या ठिकाणी शिवगर्जना केली. महाराजांचे प्रेरणादायी विचार घेऊन, महाविद्यालयामध्ये प्रातःकाली शिवजयंती साजरी केली.
महाविद्यालयीन विद्यार्थी विवेक कोरडे यांनी शिवगर्जना करून अवघा परिसर शिवमय केला. विद्यार्थ्यांनी भगवे ध्वज फडकून जय भवानी जय शिवराय, हर हर महादेव, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, सचिव परेश घोडे, प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनीही शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील कला शाखा समन्वयक प्रा. सुभाष घोडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल पडवळ, इतिहास विभाग प्रमुख प्रा.नीलम गायकवाड, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.प्रवीण गोरडे, प्रा. आकाश धुमाळ,
रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.माधुरी भोर, प्रा.पुनम कुंभार, वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.ज्योती गायकवाड, प्रा. योगेश भालेराव, प्रा.पुनम पाटे, प्रा अजय ननवरे आणि महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नीलम गायकवाड आणि प्रा सुभाष घोडे यांनी आभार व्यक्त केले.