राक्षे विरुद्ध मोहोळ लढतीच्या चौकशीसाठी सक्षम व तज्ज्ञ समितीची नियुक्ती

1 min read

अहिल्यानगर दि.१८:- अहिल्यानगरमध्ये २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील गादी विभागाच्या अंतिमफेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात कुस्ती झाली होती. या लढतीच्या निकालावर वाद झाला होता. त्यामुळे या लढतीच्या चौकशीसाठी सक्षम व तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने घेतला असल्याची माहिती कुस्तीगीर संघाचे सचिव योगेश दोडके यांनी दिली.या समितीच्या प्रमुखपदी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रा.विलास कथुरे हे असणार आहेत. त्यांच्या समवेत ४ तज्ज्ञ पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली. ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील पंचांच्या निर्णयाची सखोल चौकशी करून २८ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे अहवाल सादर करणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे