निधी उपलब्धता असलेला बिरेवाडी फाटा ते साकुर रस्ता अजूनही प्रतिक्षेत

1 min read

अहिल्या नगर दि.१८:- कित्येक वर्षांपासून खड्डेमय असणा-या बिरेवाडी फाटा ते साकुर रस्त्यासाठी जवळपास आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपुर्वी निधी उपलब्धता होऊन देखील अद्यापपर्यंत काम सुरू झालेले नाही.रणखांब फाटा ते वरवंडी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असुन त्यापैकीच जवळपास दोन किमी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि वन विभाग यांच्या समन्वयाच्या अभावामुळे प्रलंबित आहे तसेच उर्वरित रस्त्याचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे.साकुर ते वरवंडी फाटा रस्त्याचे काम झाले पण संपुर्ण साईड पट्टी तसेच संपूर्ण फर्निचरचे काम मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

पारनेर संगमनेर तालुक्यातील नागरिकांचा मुख्य दळणवळणाचा रस्ता म्हणजेच साकुर-टाकळी ढोकेश्वर रस्ता. सदर रस्त्याला मांडवे बुll(संगमनेर)-मांडवे खुll(पारनेर) मुळा नदी पुलानजीक संगमनेर हद्दीतील जीवघेणे खड्डे, मुळानदी पुलाचे डांबरीकरण आणि स्ट्रक्चर खराब झाले असून तात्काळ दुरुस्ती करणेबाबत… शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर/पारनेर तसेच आजी- माजी लोकप्रतिनिधी यांना दिलेल्या निवेदनात साकुर टाकळी ढोकेश्वर रोड, सदर रस्त्याला मुळानदी पुलानजीक संगमनेर/पारनेर सा.बां.विभाग हद्दीत जीवघेणे खड्डे पडलेले असून.अगदी पुलानजीक मांडवे  दिशेला रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे असुन प्रवाशांच्या हितासाठी ती तोडण्यात यावीत. तसेच मोठ्याप्रमाणात जिवघेणे खड्डे पडलेले असुन पुलानजीक सुरू असलेले कॉक्रीटचे काम अतिशय अरुंद आणि नवीन झालेल्या कामाला देखील खड्डे पडलेले आहेत. सदर ठिकाणाहून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. साईड पट्टी तसेच साईड गटारचे काम व्हावे.तसेच मुळा नदी पुलावरील डांबरीचा लेअर पूर्णपणे उध्वस्त झालेला असून पुलाच्या मुख्य स्ट्रक्टरचे स्टील देखील वरती आलेले असून सदर गोष्टीचा विचार करता सदरचे खड्डे व पुलावरील डांबरीकरण तात्काळ पूर्ण करावे. एखादी दुर्दैवी घटना घडण्याअगोदर सदरची दुरुस्ती तात्काळ व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय तसेच अमोल खताळ पाटील (आमदार, संगमनेर विधानसभा), काशिनाथ दाते (आमदार, पारनेर-नगर विधानसभा), बाळासाहेब थोरात (मा.महसूल मंत्री, महाराष्ट्र शासन), निलेश लंके (मा.आमदार, पारनेर-नगर विधानसभा)
(खासदार, नगर दक्षिण लोकसभा) यांनादेखील देण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे