अहिल्यानगर मध्ये बारावीचा पहिला पेपर कॉपीमुक्त; ९८३ विद्यार्थ्यांची दांडी
1 min read
अहिल्यानगर दि .१२:- अहिल्यानगर जिल्हा कॉपी मुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने तगडे नियोजन केले आहे. जिल्ह्यात १०९ परीक्षा केंद्र आहेत. त्याकेंद्रांपैकी ४० केंद्रांना संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ शुटिंग करण्यात आले. तसेच पोलीस गस्ती पथक व बैठे पथकही तैनात करण्यात आले होते. त्यामुळे आजचा पहिला पेपर कॉपीमुक्त गेला असून कोठेही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.राज्य परीक्षा मंडळाकडून उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १२ वी) मंगळवार (ता.११) पासून सुरू झाली आहे.
जिल्ह्यात ६२ हजार ४९९ परीक्षार्थीनी परीक्षा दिली आहे. तर ९८३ विद्यार्थ्यांनी पहिल्याच पेरपरला दांडी मारली. तसेच कॉपीमुक्त अभियानासाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यात कॉपी सारखे गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करणे.
गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता रद्द करणे आदी कारवाई करणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रत्येकी दोन बैठे पथकांकडून निगराणी ठेवण्यात येत आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश घोषित केला आहे.