स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
1 min read
जुन्नर दि.१४:- स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सूचनेनुसार श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर/आंबेगाव धालेवाडी निवृत्तीनगर तालुका जुन्नर जिल्हा पुणे ह्या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार असल्याची माहिती संघटनेने दिली. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. व शेतकरी संघटना कडून देखील उमेदवार उभे करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमोद केरभाऊ खांडगे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांना शेट्टी यांनी विघ्नहरचे निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे, संभाजी पोखरकर, मनसे शेतकरी सेना पुणे अध्यक्ष योगेशजी तोडकर,
पिंपळगाव महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष अनंत खांडगे पाटील, गुंजाळवाडी विकास सोसायटी माजी चेअरमन आनंद ढवळे, प्रगतशील शेतकरी मनोज चव्हाण, प्रगतशील शेतकरी महेश खांडगे,मीना खांडगे उपस्थित होते.