महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनावणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
1 min read
बीड दि.१:- मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली. यावेळी धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याचं म्हटलं. त्यांच्या या भूमिकेबाबत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “महंत नामदेव महाराज शास्त्रींनी काय बोलावं, काय प्रतिक्रिया द्यावी हा अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे त्यासंदर्भात काही टीका करण्यापेक्षा मुंडे कुटुंबीयांला भगवान गडाचा पाठिंबा आहे हे वारंवार महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितलेलं आहे.
त्यामुळे भगवान गडाने कोणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे त्यावर मी काय बोलणार?”, असं खासदार बजरंग सोनावणे यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.