पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघातात १ ठार; तीन जण जखमी; अपघातात ट्रॅक्टरचे तुकडे

1 min read

संगमनेर दि.१३:- संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथे पिकअपने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टरचालक संतोष शिंदे हे जागीच ठार झाले. तर त्या ठिकाणाहून जाणार्‍या तीन मुलांनाही धडक बसली आहे. यामध्ये अनुराग गोडे, अपेक्षा गोडे, राणी लोहकरे हे तिघे जखमी झाले. या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले.

संतोष शिंदे (रा. उंब्रज एक, ता.जुन्नर जि.पुणे) हे ट्रॅक्टर घेऊन आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होते. याचदरम्यान पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारात त्यांना भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर खासगी रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोळासणे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर क्रेनच्या माध्यमातून अपघातग्रस्त ट्रॅक्टर महामार्गावरून बाजूला घेण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे