कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा पुणे अंतर्गत जुन्नर व आंबेगावच्या शेतकऱ्यांना तामिळनाडूत प्रशिक्षण
1 min read
जुन्नर दि.१३:- महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे अंतर्गत प्रकल्प संचालक आत्मा पुणे सुरज मडके व प्रकल्प उपसंचालक आत्मा पुणे श्रीधर काळे, आंबेगाव तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांचे मार्गदर्शनाखाली गन्ना प्रजनन संस्था कोईमतुर (राज्य तमिळनाडू) या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंतरराज्य प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले होते.दि.८ जानेवारी रोजी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी कोईमतुर या ठिकाणी डॉ.कार्थिक डायरेक्टर कृषी विस्तार यांच्या सहकार्याने मिलेट विभागाच्या डॉ.कुमारी विनोदना असिस्टंट प्रोफेसर यांनी बाजरी नाचणी रागी ज्वारी सावा राजगिरा या पिकावर संशोधित केलेल्या जाती विषयी मार्गदर्शन केले.
तसेच कीटकशास्त्र विभागाचे अमृत मलिक यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापना विषयी परपजीवी किटका विषयी सविस्तर माहिती दिली. सदर तीन दिवसीय प्रशिक्षणात प्रशिक्षणात प्रजनन संस्था कोईमतूर या ठिकाणी डॉ. डी निलामती मॅडम यांनी टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे उसाचे रोप निर्मिती याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच सदर प्रशिक्षणामध्ये जैविक खतांचा वापर तसेच गुळ निर्मिती तसेच गुळ प्रक्रिया युनिटला भेट, ऊस पिकासाठी वापरण्यात पाण्याचा योग्य वापर तसेच ऊस पिकांमधील तानांचा बंदोबस्त तसेच ऊस पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन व व्यवस्थापन करत असताना जमिनीमध्ये येणाऱ्या समस्या तसेच ऊस पिक व्यवस्थापनामध्ये ज्या काही अवजारे असतील.
मशागतीसाठी लागणारी मशिनरी असतील ऊस लागवडीच्या मशिनरी असतील इत्यादी विषयी सदर संशोधन केंद्रामध्ये सखोलशी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच तसेच ऊस पिकातील प्रमुख कीड व रोग व्यवस्थापन याविषयी देखील शास्त्रज्ञांनी सखोल असे मार्गदर्शन केले.
तसेच बिल्डिंग प्रजनन संस्थेमध्ये ज्या काही नवीन प्रजाती तयार होत असतात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या शिफारस केलेल्या ज्या काही महत्त्वाच्या प्रमुख जाती आहेत उसाच्या जाती त्यांची सविस्तर माहिती शास्त्रज्ञांनी प्रशिक्षणा दरम्यान दिली.
सदर प्रशिक्षणा दरम्यान ऊस प्रजनन संस्थेमध्ये प्रत्यक्ष प्लॉट वरती शास्त्रज्ञांनी उसाचे प्रजनन प्रक्रिया सविस्तर प्रक्रिया विविध टप्प्यातील प्रजनन प्रक्रिया विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी डॉ.पी गोविंदराज संचालक आय सी आर शुगर किंग ब्रीडिंग इन्स्टिट्यूट, डॉ.पुत्र प्रताप, डॉ.पी मुरली अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन ऊस उत्पादन वाढीसाठी ते ते त्यांच्या शेतावरती करत असलेले नवीन नवनवीन प्रयोग याची माहिती शेतकऱ्यांनी घेतली. धोंडीभाऊ पाबळे, सूर्यकांत विरणक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा आंबेगाव/जुन्नर यांनी सदर प्रशिक्षणाचे नियोजन केले.
संशोधन केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ यांनी दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना जे काही प्रशिक्षण व सखोल अशा मार्गदर्शन केलं त्याबद्दल शेतकऱ्यांमधून ऊस भूषण विकास चव्हाण उत्तम जाधव व ओमकार वाळुंज यांनी सदर संस्थेतील शास्त्रज्ञांचे उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.