शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; जुन्नर शेतकरी संघटनेचे कृषी मंत्र्यांना निवेदन

1 min read

नारायणगाव दि.१०:- राज्य शासनाने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. शासनाने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा साडेसात एचपी पर्यंत विज बिल माफी केली आहे. परंतु उर्वरित लीप धारक साडेसात एचपी वरील शेतकऱ्यांची वीज बिल माफी देखील झालीच पाहिजे.शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये कर्जबाजारीपणामुळे उदापूर येथील पंधरा दिवसांपूर्वी दुधाला बाजार भाव व शेतीला बाजार भाव नसल्यामुळे प्रकाश सस्ते या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्या शेतकऱ्याला देखील न्याय मिळाला नाही.जुन्नर तालुक्यातील कृषी मंडल कार्यालय अतिशय दुरावस्था झालेली आहे त्यामुळे मोडकळी आलेल्या कार्यालयांना शासनामार्फत निधी मंजूर करून कार्यालय डागडूजी जिथे कार्यालय अपुरे पडत असेल तिथे नवीन बांधकाम करण्यात यावे.राज्य शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सोयाबीन खरेदी होत नाही त्यामुळे बाजार समितीमार्फत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे.टुकीता १०७ ह्या फ्लावर व्हरायटी बोगस बियाणे कंपनीने वाटप केले आहे. त्या बियाण्याची कंपनीकडून चौकशी करून शेतकऱ्यांना नमस्कार देण्यात यावी.असे निवेदन कृषी मंत्री माणिक कोकाटे यांनी नारायणगाव येथे देण्यात आले. या वेळी शेतकरी ज्येष्ठ नेते डॉ. गणपतराव डुंबरे, रमेश शिंदे अखिल भारतीय शेतकरी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील मनसे शेतकरी सेना अध्यक्ष योगेश तोडकर अखिल भारतीय शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष नवनाथ भांबेरे, शेतकरी संघटना युवा अध्यक्ष सचिन थोरवे, सचिव प्रवीण डोंगरे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे