नारायणगावात कृषिमहोत्सवाचे उद्घाटन संपन्न

1 min read

नारायणगाव दि.९:- ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव आयोजित ग्लोबल कृषिमहोत्सव २०२५ चे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांच्या शुभहस्ते व आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि.९ रोजी नारायणगाव याठिकाणी संपन्न झाले.कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव च्या माध्यमातून दरवर्षी हा कृषि महोत्सव आयोजित केला जातो. कार्यक्रमाच्या दरम्यान ग्रामोन्नती कृषी सन्मान २०२५ पुरस्कार वितरण व शिवनेरी हापुस आंबा लोगोचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषि मंत्री यांनी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या दालनाला भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली. या कृषि महोत्सवात ३०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दालने, एआय व आयओटी तंत्रज्ञान, पशुधनासाठी मुक्त गोठा, चारा पिके, फळे, भाजीपाला, धान्य, FPO व महिला बचत गट उत्पादने, कृषि व कृषिपूरक व्यवसायाच्या माहितीची दालने, कृषि तज्ञांचे मार्गदर्शन, कुकुट – मधमाशी पालन, पौष्टिक तृणधान्य, न्यूटी मिलेट्स पोषण बाग, प्राकृतिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, ड्रोनव्दारे फवारणी यांची प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत.ग्रामोन्नती मंडळाच्या माध्यमातून शिक्षण कार्य व कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. हा कृषि महोत्सव ९ ते १२ जानेवारी पर्यंत चालू असून प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर सोडत बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी या माहितीपुरक कृषि प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी.यावेळी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, आशा बुचके, ॲड.संजय काळे, अनिल मेहेर, शिवाजी खैरे, तान्हाजी बेनके, अशोक घोलप, माऊली खंडागळे, संजय वारुळे, मोहित ढमाले, निवृत्ती काळे, प्रकाश ताजने, आरती वारुळे, सारंग घोलप, गणपत डुंबरे, संजय काचोळे, प्रकाश पाटे, सुजित खैरे, समीर वाघ, कैलास भोसले, शुभदा वाव्हळ, राजेंद्र मेहेर, मोनिका मेहेर, गणेश भोसले, ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे