मेंढपाळांना बिबटपासून सुरक्षेसाठी जुन्नर वन विभागामार्फत सौर दिवे आणि तंबूचे वाटप
1 min read
ओतूर दि.८:- जुन्नर वनविभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्या पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घरगोठ्यांभोवती सौर कुंपण इत्यादी प्रकारच्या अनेक उपाययोजना वन विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून उघड्यावर झोपणा-या मेंढपाळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहून अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर यांनी त्यांचेसाठी सौर दिवे आणि तंबूची संकल्पना मांडली.
वन विभागाने हे सुरक्षिततेचे पाऊल तात्काळ उचलले असून जुन्नर वनविभागातील वनपरिक्षेत्र ओतूर अंतर्गत असणाऱ्या ओतूर व उदापूर मधील मेंढपाळांना राहण्यासाठी 40 तंबू व 40 सौर दिवे वाटप करण्यात आले आहेत.सौर दिवे आणि तंबूमुळे बिबट हल्ला, सर्पदंश तसेच पाऊस व थंडी यापासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होईल.
असे लहू ठोकळ , वनपरीक्षेत्र अधिकारी ओतूर हे म्हणाले. दि.8 जानेवारी रोजी ओतूर, उदापूर, डींगोरे, आळु, मांदारणे येथील वास्तव्यास असलेल्या राजेंद्र बाळू कोळपे, ज्ञानेश्वर दिनकर डुबे, नितीन भाऊसाहेब चितळकर, बबन बाळू दुबे, कोंडाजी दगडू खामगळ, राहुल बिरु बरकडे, बाबुराव उदा बरकडे, योगेश भाऊसाहेब कोळपे,
अविनाश वामन घोगरे, निलेश रामदास पानसरे, सोपान खंडू चितळकर, सुखदेव शिवाजी मोरे, बबन विष्णू कारंडे, धुळा बबन बरकडे, गणेश चिंधू माने, पंकज अशोक डोळझाके, दीपक नाना शेंडगे, बबन बाळू भांड, देवराम छबू काळे, सुभाष धोंडीबा चितळकर, राहुल खंडू चितळकर, भीमा भिका चितळकर,
संजय दगडू खामगळ, महादू रामदास खेमनर, संदीप मानकू कोकरे, लक्ष्मण गणपत विचकुले, संतोष बाळू तांबे, नामदेव महादू तांबे, सोन्याबापू काळूराम घुले, सदा बाळू तांबे, मालू गोपीनाथ कारगळ, आदेश भीमा करगळ, गणेश काळुराम कोकरे, भीमा गोपीनाथ कारगळ,
संतोष साळवा बाचकर, अंकुश रामदास पोकळे, पांडुरंग बुधा बरकडे व इतर अशा एकुण 40 मेंढपाळांना सौर दिवे व तंबूचे वाटप उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या आदेशावरून वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले.
सौर दिवा कशा प्रकारे वापरावा तसेच तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल याचे प्रात्यक्षिक एस.एम. बुट्टे वनपाल ओतूर, विश्वनाथ बेले वनरक्षक ओतूर तसेच दादाभाऊ साबळे वनरक्षक उदापूर यांनी करून दाखवले.
यावेळी निकिता बोटकर परिविक्षाधीन अधिकारी तसेच वन कर्मचारी किसन केदार फुलचंद खंडागळे गणपत केदार व गंगाराम जाधव आदी नी सहकार्य केले.