सुरेश धस, जरांगे पाटील मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक – गुणरत्न सदावर्ते
1 min read
मुंबई दि.६:- सुरेश धस, जरांगे पाटील हे मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक आहेत. मृत व्यक्तीच्या नावावर राजकारण करून मंत्रिपद न मिळाल्याने ते आरोप करत आहेत. पावशेर दारू पिऊन जर धनंजय मुंडेंना अपमानित करण्याच धाडस कराल तर गय करणार नाही, असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी (ता. ४) सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा परभणीत काढण्यात आला होता. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोलतांना धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना धक्का लागला तर घरात घुसून मारु, असा इशारा दिला. त्यावर आता वकील सदावर्ते यांनी भाष्य केले.