इंदिरानगर शाळेत बालआनंद मेळावा

1 min read

बेल्हे दि.६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर बेल्हे (ता.जुन्नर) येथील शाळेत बालआनंद मेळावा भाजी बाजार भरविण्यात आला. या बाजारात सर्व विद्यार्थ्यांनी कांदे, बटाटे, पालक मेथी, शेपू, पावटा, पेरू, शेवगा, गावरान अंडी, काकडी, कांदा पात, खाद्य पदार्थ, इडली सांबर, चायनीज भेळ ओली, भेळ चना चटपट, मसाला पापड, आलू फ्राय, कांदे पोहे, गोळ्या बिस्कीट, सौंदर्य प्रसाधने आदी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे खरेदी विक्री चे गणिती व्यवहार ज्ञान वाढण्यास मदत झाली. महिला भगिनी पालकांनी ग्रामस्थांनी खाद्य पदार्थ भाज्या घेण्यासाठी गर्दी केली होती.प्रसंगी बेल्हे गावचे उपसरपंच राजू पिंगट, समवेत युवा नेते मयूर गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार, किसन देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण गुंजाळ, उपाध्यक्ष अंजुम जुबेर शेख, अल्पेश सोनवणे, प्रभाकर गुंजाळ, सोमनाथ जेडगुले , रिजवाना शेख, सलमा फिरोज शेख, सविता भंडलकर, पुजा सोनवणे, शितल खोमणे, रोहीदास विसावे, नितीन गोफणे, दत्ता गोफने, प्रकाश सोनवणे, लता जगदाळे, अंजली आंबेकर, रविंद्र डुंबरे, देशपांडे काका, वाघचौरे काका, योगेश खोल्लम आदी मान्यवरांनी बाजारला भेट देऊन वस्तू खरेदी करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला व विद्यार्थ्यांनचे कौतुक केले. सर्व नियोजन मुख्याध्यापक निवृत्ती हाडवळे व उपशिक्षिका पुष्पा गुंजाळ शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य यांनी केले होते. ग्रामस्थ महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे