इंदिरानगर शाळेतील सर्व विद्यार्थिनी साकारली सावित्रीबाईंची वेशभूषा

1 min read

बेल्हे दि.३:- (ता.जुन्नर) येथील इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्ताने सर्व विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेमध्ये शाळेत आल्या. सर्व विद्यार्थ्यांची कॉलनीतून प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सर्व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती हाडवळे, अल्पेश सोनवणे, उपशिक्षिका पुष्पा गुंजाळ शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अंजुम शेख, प्रियांका देशमुख, रेखा देशमुख, रिजवाना शेख, शितल भाईक अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी उमेर युसुफ कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त युसुफ कुरेशी सर्व विद्यार्थ्यांना मिसळ ची मेजवानी दिली तर तेजस्विनी जेडगुले हिच्या वाढदिवसानिमित्त रोहिणी व सोमनाथ जेडगुले यांनी सर्व विद्यार्थ्यांना या बालिका दिन कार्यक्रमाचे निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.उपस्थित सर्वांचे निवृत्ती हाडवळे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे