इंदिरा गांधी हायस्कूल मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
1 min read
आणे दि.३:- श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा (ता.जुन्नर) येथे भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी कळस गावच्या माजी सरपंच लक्ष्मी गाडगे या उपस्थित होत्या. विद्यालयातील शिक्षिका माया माळवे, जयश्री थोरात व विद्या औटी यांनी सावित्री बाईंच्या कार्याविषयी विद्यार्थ्याना माहिती दिली. तर विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणांमधून सावित्री बाईंच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम जगताप यानी भूषाविले. सूत्रसंचालन रमेश मालुंजकर यांनी केले. या प्रसंगी संतोष कर्डक, सविता पवार व सर्व शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते.