जिल्हा परिषद शाळेच्या अमृतमहोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम
1 min read
गुंजाळवाडी दि.३:- गुंजाळवाडी (ता.जुन्नर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नुकतेच ७५ वर्ष पूर्ण झाल्याने शाळेचा अमृतमहोत्सव अनेकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने शाळेत दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सकाळ सत्रात ग्रामस्वच्छता, पुस्तकदिंडी, व ७५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पं. समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर व विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे यांची उपस्थिती लाभली. BDO व ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांनीच पुस्तकदिंडीत सहभाग घेतला.
शाळेचा सुंदर परिसर व विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून साहेबांनी शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे छानसे नियोजन ग्रामस्थांच्या सहकार्याने मुख्याध्यापक पाटीलबुवा खामकर व उपशिक्षक तुकाराम खोडदे सर यांनी केले. शाळेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असणारे कै. हरीभाऊशेठ गुंजाळ यांच्या पुतळ्याचे मारुती बोरचटे,
लहू गुंजाळ व त्यांचेसमवेत उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते पूजन करून फेटा व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रतिमापूजन व स्टेजपूजन उपस्थित ग्रामस्थ व केंद्रातील शिक्षक यांच्या हस्ते संपन्न झाले. सायंकाळी भूपाल शेळके यांचे शिवव्याख्यान संपन्न झाले. तदनंतर ७५ वर्षीय जेष्ठांच्या उपस्थितीत, तसेच शाळेचे माजी शिक्षक,
लोकनियुक्त सरपंच नयना गुंजाळ उपसरपंच संगिता गुंजाळ व शालेय समितीचे अध्यक्ष सतिश बोरचटे, उपाध्यक्ष मारुती बोरचटे व इतर सदस्य यांच्या हस्ते शाळेचा केक कापण्यात आला. सरपंच नयना गुंजाळ तसेच शिक्षक नेते रमाकांत कवडे, तानाजी मुळे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व गावातील दिवंगत व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करत श्रद्धांजली समर्पित करण्यात आली. राष्ट्रगीत व हीच आमुची प्रार्थना याने कार्यक्रमास शुभारंभ झाला. तदनंतर गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बालचमूंनी विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत कै. बाजीराव कारभारी बोरचटे, कै. फुलाबाई बाजीराव बोरचटे व कै. देवराम (आबा) बाजीराव बोरचटे यांच्या स्मरणार्थ काशिनाथ बाजीराव बोरचटे, रमेश बाजीराव बोरचटे व सिद्धी विनायक इव्हेन्ट्स चे प्रोप्रायटर सिद्धेश देवराम बोरचटे यांचेकडून शाळेसाठी तब्बल ७५ हजारांची कायम ठेव पावती जाहीर झाली.
कै.गेणभाऊ मारुती बोरचटे यांचे स्मरणार्थ गुरुनाथ (सर) गेणभाऊ बोरचटे व विश्वनाथ गेणभाऊ बोरचटे बंधूंकडून शाळेला १० पाणी जार उपलब्ध झाले. तसेच कै. हौसाबाई बाळू गुंजाळ यांच्या स्मरणार्थ नयना रामदास गुंजाळ सरपंच यांसकडून शाळेला ०५ पाणी जार उपलब्ध झाले. तसेच कै. चंद्रभागा नामदेव बोरचटे यांच्या स्मरणार्थ शाळा समिती अध्यक्ष सतिश नामदेव बोरचटे यांजकडून शाळेसाठी ०५ पाणी जार उपलब्ध झाले.कार्यक्रम प्रसंगी पंकज भाऊ कणसे (पंकज स्टोन क्रेशर उंचखडक) यांसकडून शाळेसाठी ५००० रुपये तसेच विकास अधिकारी सचिन भोसले नारायणगाव यांसकडून २१०० रु देणगी शाळेसाठी प्राप्त झाली.
या कार्यक्रमासाठी पाटीलबुवा खामकर व तुकाराम खोडदे तसेच बबन गुंजाळ, दत्ता यादव, नितीन गुंजाळ, शंकर पर्वती गुंजाळ, अमोल बोरचटे, सिद्धेश बोरचटे, दिनेश बोरचटे, पाराजी बोरचटे, महेश वाघ, देवराम गुंजाळ, गोरक्षनाथ गुंजाळ, शुभम गुंजाळ, सुभाष बोरचटे, राहूल बोरचटे, संजू बोरचटे यांसकडून स्नेहभोजन देण्यात आले.
तसेच मुलांसाठी सखाराम काशिनाथ गुंजाळ यांसकडून खाऊसाठी सौजन्य लाभले. सतिष बांगर यांसकडून १ फ्लेक्सचे सौजन्य लाभले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या प्रशांत दिनकर औटी व मृणाल शांताराम बोरचटे (CA) यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास निधी संकलनासाठी रामदास गुंजाळ, किसन बोरचटे, राहूल बोरचटे, सचिन गुंजाळ, सतिश बोरचटे, मारुती बोरचटे, बबन गुंजाळ, गोरक्ष गुंजाळ, नितीन गुंजाळ, दत्ता यादव यांनी मोलाचा सहभाग दिला.
याप्रसंगी तालुक्यातून अनेक शिक्षक बांधव, मुंबईकर पुणेकर मंडळी व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुंजाळवाडी(बेल्हे) शाळेच्या अमृतमहोत्सवाचे सर्वत्र कौतुक झाले.