समर्थ संकुलामध्ये ग्राहक जागरण व जागरण पंधरवडा समारोप समारंभ संपन्न
1 min read
बेल्हे दि.९:- अन्न नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय जुन्नर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर आणि समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट व समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक जागरण पंधरवडा समारोप समारंभ नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे पार पडला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आखिल भारत ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी साहेब म्हणाले की, शोषण मुक्त समाज निर्माण करण्यासाठी गाव तिथे ग्राहक पंचायत हा संकल्प ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक पूर्ण केला पाहिजे.
ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. जिल्हा आयोग, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग अशा त्रिस्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय देण्याचे काम व ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेण्याचे काम ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून करण्यात आले.
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी उपस्थितांना ग्राहक हक्क व कर्तव्य समजावून सांगत चांगले नागरिक होण्यासाठी संस्कारक्षम विद्यार्थी घडायला हवेत. आपण घरबसल्या ई-दाखिल या ऑनलाइन पोर्टल मार्फत आपली तक्रार नोंदवू शकतो.
त्याचप्रमाणे घरबसल्या मोबाईलवर केलेल्या तक्रारीची सुनावणी देखील देऊ शकतो. विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर योग्य करावा. सर्च आणि ब्राउझिंग द्वारे माहिती लिक होत असते. त्यामुळे ब्राउझिंग आणि सर्च करताना विचार करावा. व्हाट्सअप स्टेटस चा गैरवापर टाळावा.
फोन पे, गुगल पे, क्यू आर कोड वापरताना ग्राहक म्हणून सजग राहावे. सायबर फ्रॉड अनेक मोठ्या प्रमाणात होत आहे. विद्यार्थ्यांनी सायबर फ्रॉड पासून सावध राहावे. गेमिंग झोन मधून बाहेर पडा. गेम मधून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. सहज पैसा मिळवायला जाऊ नका.
कायदेशीर बाबींची तपासणी करून मगच आर्थिक निर्णय घ्या असा सल्ला यावेळी केंद्रीय कार्यकारणी सदस्य विजय सागर यांनी विद्यार्थ्यांना दिला.यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,
बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, केंद्रीय कार्यकारणी सदस्य अखिल भारतीय ग्राहक पंचायत विजय सागर, मध्य महाराष्ट्र प्रांत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे अध्यक्ष बाळासाहेब औटी, अशोक भोर, जगन्नाथ खोकराळे, शैलेश कुलकर्णी, कौशल्या फापाळे, देवराम तट्टू, नंदाराम भोर, लक्ष्मण तट्टू,
जुन्नर तहसीलचे वैद्यमापन शास्त्र विभाग निरीक्षक राजेश बोरखळकर, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, क्रीडा संचालक प्रा.एच पी नरसुडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव,
प्रा.भूषण दिघे,प्रा.गणेश बोरचटे,प्रा.योगेश राऊत,प्रा.विलास गवारी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक अशोक भोर यांनी सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी मानले.