स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करुन त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात येणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

मुंबई दि.३१:- स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करुन त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर कामगारांना स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असले,

तरी त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रास्त-भाव दुकानात धान्य मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,राज्यमंत्री योगेश कदम,मुख्य सचिव सुजाता सौनिक,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता,अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल,प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे