राजुरीत सलग दुसऱ्या दिवशीही बिबट्याचा हल्ला
1 min readराजुरी दि.२७:- राजुरी येथे सलग दुसऱ्या दिवशीही बिबट्याच्या हल्ल्यात खिल्लारी जातीची कालवड ठार झाली परिसरात भीतीच वातावरण पसरल आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजुरी (ता.जुन्नर) येथील घंगाळे मळा शिवरातील ज्ञानेश्वर सदाशिव घंगाळे यांच्या गोठ्यात मंगळवार (दि.२५) रोजी पहाटेपाच वाजण्याच्या सुमारात बिबट्याने बंदिस्त गोठ्याची तार वाकून आत मध्ये प्रवेश केला. गोठ्यामध्ये बांधलेली खिलारी जातीची कालवड जागीच ठार गेले. ज्ञानेश्वर घंगाळे यांना गायांच्या हंबरण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी गोठ्यातील दरवाजा उघडून पाहिले तर बिबट्या कालवडीवर हल्ला करताना पाहिले. त्यांनी आरडाओरडा केला त्यानंतर बिबट्याने तेथून फळ काढला. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या कालवळीचा पंचनामा केला. राजुरी गावच्या परिसरात बिबट्याचे दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवरती हल्ले होत आहेत. वनविभागाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पिंजरे लावावे अशी मागणी बाळासाहेब घंगाळे यांनी केली.