श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर दाते तर उपाध्यक्षपदी अनिल आहेर

1 min read

आणे दि. ८ : आणे (ता. जुन्नर) येथील श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर दाते यांची, तर उपाध्यक्षपदी अनिल आहेर यांची निवड झाली असून गावच्या सरपंच प्रियंका दाते, ग्रामस्थांनी व भाविकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या नवनिर्वाचित विश्वस्तांची पदाधिकारी निवडीची सभा संस्थेचे मावळते अध्यक्ष विनायक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी देवस्थान संस्थेच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी मधुकर बाबूराव दाते यांची, तर उपाध्यक्षपदी अनिल किसन आहेर यांची सर्वानुमते निवड केली. यावेळी खजिनदारपदी रंगनाथ धोंडिभाऊ आहेर, सचिवपदी नितीन गंगाधर आहेर, सहसचिवपदी बाबूराव आनंदा दाते यांची निवड करण्यात आली. यावेळी सीताराम दाते, एकनाथ आहेर, नेताजी आहेर, राधेश्याम दाते, निशांत वाडेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, नवनिर्वाचित विश्वस्तांमध्ये (बलुतेदार वाडा)- बाळासाहेब कदम, विठ्ठल दिवेकर, (भाटमुळी वाडा)- मधुकर दाते, बाबूराव दाते, (दाते पाटील वाडा)- ज्ञानेश्वर दाते, रंगनाथ दाते, (बाळंद्री वाडा) अंकुश दाते, दत्तात्रेय शिंदे, (नवा वाडा) – विनायक आहेर, विजय आहेर, (आहेर पाटील वाडा)- अनिल आहेर, बाळशिराम आहेर, (कुंभार्डी वाडा)- नितीन आहेर, रंगनाथ आहेर, (उद्यमी वाडा)- सुधीर आंबेकर, सुनील धुमाळ, (पुणे व मुंबईकर प्रतिनिधी)- संजय दातेंचा समावेश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे