गावातील बालविवाह राेखण्याची जबाबदारी गावचे सरपंच, ग्रामसेवकावर

1 min read

नगर दि.८:- ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी काटेकाेर उपाययाेजनांची गरज आहे. अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होत असल्याच्या तक्रारी नगर जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. गावात बालविवाह राेखण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवकावर आहे. आपल्या परिसरात कोठेही बालविवाह होत असल्यास नागरिकांनी बालविकास अधिकारी तसेच चाइल्डलाईन क्रमांक १०९८ यावर माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्वच गावात ग्राम बाल संरक्षण समिती कार्यरत आहे. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी व २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा यांचा बालविवाह होणार नाही, याची जबाबदारी गावचे प्रमुख म्हणून सरपंच यांची आहे. बाल संरक्षण समितीची नियमित बैठक घेऊन इतिवृत्त व कार्यवाहीचा अहवाल अहमदनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा.

यासोबतच गावातील ग्रामसेवकांची ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामधील आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे