रोहिदास शिंदे यांचा महिला सक्षमीकरणासाठी मोठा वाटा:- संजय ढमढेरे

1 min read

उदापूर दि.२५:- डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटामधील जवळपास पाच हजार महिलांना उमेद महाराष्ट्र लघुउद्योग विकास निगम, रॅम्प योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठान जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने व रोहिदास शिंदे यांच्या दातृत्वाने एक दिवसीय मोफत कार्यशाळांचे उदापूरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

यात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे जवळपास सहा दिवस ही कार्यशाळा उदापूरमध्ये घेण्यात आली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन व्यापार क्षेत्रामध्ये एक उंच भरारी घेऊन सुद्धा सामाजिक क्षेत्राची जाण असल्यामुळे रोहिदास शिंदे हे नेहमीच उदापूर गावांमधील विकास कामांमध्ये हिरीरीने भाग घेतात.

अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी उदापूरमधील देवस्थानांना हायमास्ट दिवे बसवून दिले आहेत. उदापूरमधील महिला सक्षमीकरण करण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे त्यांचे कार्य हे वाखण्याजोगे असल्याचे सेवानिवृत्त शिक्षक, उपमुख्याध्यापक संजय ढमढरे यांनी व्यक्त केले.

कार्यशाळेत महिला, बचत गट यांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण, योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना केंद्र शासनाच्या २२ विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. उद्यम आधार व कोर्सचे सर्टिफिकेट मिळणार आहे. व्यवसाय व व्यवसाय लोन यासाठी मदतदेखील मिळणार आहे, अशी माहिती हायस्पीड स्किल हब जुन्नरचे संचालक संदीप ताजणे, दिलीप भगत यांनी दिली.

बचतगटातील सर्व महिलांना याचा लाभ मिळवण्यासाठी राजश्री वाळेकर यांनी पुढाकार घेतला मोफत कार्यशाळेने ज्ञानात आणखीन भर पडली असल्यामुळे महिलांनीदेखील समाधान व्यक्त केले केले असून त्यांच्यासाठी चहा नाश्ता व जेवणाची सोय तसेच रिटर्न गिफ्टदेखील देण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे