बीडमध्ये १ हजार २२२ शस्त्र परवानाधारक:- अंजली दमानिया

1 min read

मुंबई दि.२५:- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडावरून पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्यावर निशाणा साधला आहे. बीडमध्ये तब्बल १,२२२ शस्त्र परवानाधारक आहेत. विशेषतः वाल्मीक कराड यांच्या गँगमधील २ व्यक्तींकडे कोणताही परवाना नाही. त्यामुळे या दोघांना तत्काळ अटक करून कराड गँगला दणका द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.अंजली दमानिया यांनी मंगळवारी दुपारी एका ट्विटद्वारे बीड जिल्ह्यात वारेमाप पद्धतीने वाटप करण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.१,२२२ शस्त्र परवानाधारक इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत ३२ आहेत, तर अमरावती ग्रामीणमध्ये २४३ शस्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का? व कोणाच्या वरदहस्ताने १,२२२ अधिकृत शस्त्र परवाने देण्यात आले? अनधिकृत परवानाधारक किती असतील? असे त्या आपल्या ट्रिटमध्ये म्हणाल्या.वाल्मीक कराड यांच्या नावावर बंदूक बाळगण्याचा परवाना आहे. पण त्यांच्याच गटातील कैलाश फड व निखिल फड या दोघांकडे कोणतेही लायसन्स नाही. मी यासंबंधी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना मेसेज केला आहे.या दोघांना तत्काळ अटक करून कराड गँगला पहिला दणका द्यावा. तसेच या सर्व परवान्यांची तत्काळ चौकशी करावी अशी माझी मागणी आहे, असेही अंजली दमानिया आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे