पंकजा मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर घेतली पर्यावरण विभागाची बैठकीत

1 min read

मुंबई दि.२५:- पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमांविषयी सुनियोजित आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण आणि वातारवणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या.राज्यातील पशुसंवर्धन विभागाचाही यावेळी मंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. विभागाची स्थापना आणि वाटचाल, विभागाची ध्येय धोरणे, राज्यातील पशुधन,राज्य व केंद्र पुरस्कृत योजना, एकात्मिक सर्वेक्षण योजना पशुगणना, जिल्हा वार्षिक योजना, विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.यावेळी बैठकीला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम, पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विभागाच्या योजना, सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे