समर्थ इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग मध्ये शपथविधी समारंभ संपन्न; मानवतेची सेवा करण्याचे उत्तम क्षेत्र म्हणजे नर्सिंग-डॉ.मनोज वेठेकर

1 min read

बेल्हे दि.२०:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, बेल्हे या नर्सिंग महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात म्हणून शपथविधी समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेच्या संचालिका व माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ.मनोज वेठेकर उपस्थित होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग च्या प्राचार्या लवीना कदम, समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे डॉ.रमेश पाडेकर, डॉ.राजेंद्र निचित, यशवंत फापाळे, बीसीएस कॉलेजचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले, रिसर्च इनोव्हेशन व इंटरनॅशनलायझेशन सेल चे डॉ. प्रतिक मुणगेकर, समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, समर्थ आयटीआयचे विष्णू मापारी, समर्थ लॉ कॉलेजचे शिवाजी कुमकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदिप गाडेकर, तसेच नर्सिंग व हॉस्पिटलचे सर्व स्टाफ आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक दीपप्रज्वलन सोहळ्याने झाली.डॉ. मनोज वेठेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर हातामध्ये मेणबत्ती घेऊन नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रीत्या संचलन करत शपथविधी सोहळा पार पडला. त्यामध्ये प्रमुख अतिथी डॉ. मनोज वेठेकर यांनी प्रथम वर्षाच्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना नर्सिंग व्यवसायातील उदात्त मूल्ये जपण्याची शपथ दिली. स्वतःला रुग्णांच्या काळजीसाठी समर्पित करण्याचे, नैतिक मानकांचे पालन करण्याचे, सहानुभूतीने सेवा प्रदान करण्याचे आणि त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सातत्यपूर्ण शिक्षणासाठी वचनबद्ध असल्याचे वचन दिले.डॉ.मनोज वेठेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उच्च दर्जा राखण्यासाठी, सतत संशोधन उपक्रम सुरू ठेवले पाहिजेत. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी नेहमीच सहानुभूती, व्यावसायिकता आणि सचोटीने वागायला हवे.नर्सिंग हे केवळ करिअर नाही तर काळजी, बांधिलकीने मानवतेची सेवा करण्याची उत्तम संधी असल्याचे यावेळी डॉ. वेठेकर म्हणाले.रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी करुणा, वचनबद्धता आणि सक्षमतेचे महत्त्व पटवून सांगितले. सतत शिकत रहा आणि आपल्या कामगिरीचा आलेख सतत चढता ठेवा.

प्राचार्या लविना कदम म्हणाल्या की, नर्सिंग या व्यवसायाचे महत्त्व ओळखून त्यासाठी जीवन समर्पित करणारी स्त्री म्हणजे फ्लॉरेन्स नाईटिंगेल. या नर्सिंग महाविद्यालयामध्ये उत्तम प्रकारच्या नर्सेस घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सेवाभावी वृत्तीने रुग्णांची मनोभावे सेवा करण्याची वृत्ती नवीन पिढीमध्ये वृद्धिंगत व्हायला हवी असे त्या म्हणाल्या.डॉ. प्रतिक मुणगेकर यांनी देखील समर्पित भावनेतून रुग्णांची सेवा करण्यासाठी नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी सदैव कटिबद्ध असावे असे सांगितले.माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांनी नवीन प्रवेशित नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना उत्तम नर्स बनून यशस्वी करियर करावे आणि रुग्णसेवा करून संस्थेच्या नावलौकिकात भर घालावी असे यावेळी सांगितले.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. आयेशा जमादार, प्रा. हर्षदा गोफणे यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ.विजय हांडे, डॉ. मीनाक्षी तोरणे, डॉ.तृप्ती टिपले त्याचबरोबर पल्लवी उचाळे, वैशाली कणसे, ज्योती शहापूरकर, ऋतुजा बांगर, रजनी घाडगे, वर्षा गुंजाळ, प्रणिता गगे, सुलताना पटेल, प्रज्ञा गायकवाड, पल्लवी बांगर आदि नर्सिंग च्या स्टाफ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षदा गोफणे यांनी, तर आभार प्रा.आयेशा जमादार यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे